शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभा : महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान

            डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा जिल्हा वर्धा व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभे दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान कार्यक्रमाचे आयोजन देवळी येथे करण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, मा. श्री. प्रभाकर शिवणकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख मा. डॉ. जीवन कतोरे, रेशीम विकास अधिकारी मा. श्री. विकास शिंदे, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळचे कार्यकारी अभियंता श्री. एस. एस. गोतमारे, व श्री. तेलरांधे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एन. पी. जंगवाड, मंचाचे अध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी मा. श्री. दिलीप पोहणे, जिल्हा अग्रणी प्रबंधक मा. श्री. चेतन शिरभाते,  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

     तृणधान्य पिके कोरडवाहू जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतात त्यामुळे या पिकांचा समावेश शेतकऱ्यांनी करावा तसेच तृणधान्य पिके वर्धा जिल्ह्यातील शेतकरी निःसंशय घेऊ शकतात. कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी पिके म्हणजे तृणधान्य पिके आहेत. मानवी जीवनात रोजच्या आहारात तसेच लहान मुलांना तृणधान्य घेणे आवश्यक आहे तसेच यापासून विविध प्रक्रिया युक्त पदार्थ कसे बनवता येईल व रोजगार उपलब्धता होईल याबरोबरच या वर्षी वर्धा जिल्ह्यामध्ये २ लाखाच्या वर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या परिस्थितीत कपाशी वर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहे. यावर शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे याकरिता जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत असे मार्गदर्शन श्री. प्रभाकर शिवणकर यांनी केले. 

        कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर दर महिन्यात घेण्यात आलेल्या  शेतकरी शास्त्रज्ञ मंच  विषयी सांगत कपाशी पिकासाठी शेतकऱ्यांनी एकरी दोन कामगंध सापळे लावावे व विशिष्ट कालावधी नंतर वड्या (ल्युर) बद्दलवाव्या, तसेच परोपजीवी मित्रकीटक असलेले ट्रायकोकार्ड एकरी तीन असा वापर करावा.  तसेच पौष्टिक तृणधान्य अभियान निमित्ताने शेतकऱ्यांनी मुख्य पीकांसोबतच तृणधान्य जसे नाचणी, भगर, ज्वारी, बाजरी यासारखे पीक घेतल्यास पावसाचा विलंब झाला तरी नुकसान होणार नाही असे मार्गदर्शन डॉ. जीवन कतोरे यांनी केले.

     या दरम्यान  तुती लागवडीसाठी शेड बांधकाम करणे गरजेचे आहे त्यासाठी शासना मार्फत सहेड बांधकाम झालेल्या कामाचा निधी टप्प्या टप्प्यात देणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी जर यामध्ये काम केले तर सर्वच सबसिडी त्या कुटुंबाला प्राप्त होऊ शकते. अशी माहिती रेशीम विकास अधिकारी श्री. विलास शिंदे यांनी केले.   

       महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळचे कार्यकारी अभियंता श्री. गोतमारे यांनी शेती दरम्यान विद्युत पुरवठा पुरेसा करणे याकडे जास्तीतजास्त लक्ष देण्यात येईल याबद्दल शास्वती दिली तसेच देवळी येथील विद्युत अभियंता श्री. तेलरांधे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *