आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन -2023 अंतर्गत महिलांचे पाक कला प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व कृषि विभाग, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा, उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी, उपविभागीय कृषी अधिकारी हिंगाणघाट यांच्या विभागात प्रशिक्षणसह प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी डॉ. प्रेरणा धुमाळ, शास्त्रज्ञ, गृह विज्ञान यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व , दैनंदिन आहारात समावेश व त्याचे फायदे. नाचणी, राजगिरा, वरई या तृणधान्यचे प्रात्यक्षिका द्वारे विविध पाक कलांचे प्रशिक्षण देण्यात आले त्यामध्ये नाचणीचे लाडू,भगर शेवया व राजगिरा कुकिज, शेव, भगर – राजगिरा चकली , राजगिरा लाडू, इत्यादी पदार्थ प्रत्यक्ष बनवून दाखवले.
यावेळी मा. श्री राम रोडगे (उपविभागीय कृषी अधिकारी,हिंगणघाट) , कृ.एस. व्ही. वायवळ मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी , मा. अश्विनी कुंभार मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा, श्री परमेश्वर घायतिडक (तंत्र अधिकरी,हिंगणघाट) श्री सचिन सुतार (तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट) श्री रामू धनविजय (तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर) उपस्थित होते. या प्रशिक्षणा साठी तंत्र अधिकारी सौ. खेरे मॅडम, ता.कृ.अ.साळे साहेब आष्टी, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.