भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व नायरा एनर्जी लिमिटेड संयुक्त विद्यमाने मा. श्री शिवराज सिंह चौहान यांचे संबोधन थेट प्रक्षेपण व राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख व संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या प्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान संस्था, पुसा, नवी दिल्ली येथून केंद्रीय व किसान कल्याण मंत्री मा. श्री.शिवराज सिंह चौहान यांनी थेट प्रक्षेपणा द्वारे शेतकऱ्यांना संबोधन केले. या प्रसंगी प्रगत बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्यासाठी ड्रोन आणि नॅनो-युरियाचा वापर, हमीभाव वर खरेदी सुनिश्चित करणे, पीक विमा योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना संरक्षण, शेतकऱ्यांनी केवळ कच्चा माल न विकता त्यावर प्रक्रिया करून अधिक नफा मिळवणे या विषयांवर मा. श्री शिवराज सिंह चौहान यांनी भर दिला.
सदर कार्यक्रमाकरिता वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. जीवन कातोरे, नायरा चे डेपो मॅनेजर श्री. संजय अग्रवाल, श्री राधाकृष्ण, माजी सरपंच सौ.राजश्री गावंडे बायफ च्या कु. अस्मिता भांदक्कर, ग्रामसेवक श्री. दीपक होले प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी दहेगाव (गावंडे), निमगाव, अंबोडा, दहेगाव (स्टेशन) व दहेगाव (मिस्कीन) या गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
शेतकरी अन्नदाता आहे व त्यांचा सम्मान करणे म्हणजे आपल्या राष्ट्राचा सम्मान करणे होय. वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न घेण्याचा मानस ठेवला. कपाशी व हरभरा पिकांसोबत शेती आधारित उद्योग करणे देखील अत्यावश्यक आहे असे आवाहन या प्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. जीवन कातोरे यांनी केले. माजी सरपंच सौ.राजश्री गावंडे यांनी गावातील शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असा सल्ला या प्रसंगी दिला. पिक संरक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझिरे यांनी हरभरा पिकातील कीड व रोग नियंत्रण तसेच जैविक कीड व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला आयोजित राज्यस्तरीय भव्य प्रदर्शनी अॅग्रोटेक – २०२५ विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. श्री. चंदू वाघाडे यांनी प्रकल्पाद्वारे होणारे उपक्रम या विषयी माहिती विस्तृत केली.
या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी श्री. इरफान अली, श्री. प्रीतम कडू, श्री. माधव घोडे, सौ. स्नेहलता सावरकर, श्री. आशिष दिघिकर, श्री. शंकर आडे, श्री. केतन कडूकर यांना कृषि व कृषि आधारित उद्योग क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, येथील कु. पायल उजाडे, श्री. गजबीये, श्री. गजेंद्र मानकर, श्री. किशोर उगलमुगले तसेच नायरा व बायफ यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी योगदान दिले.



