कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ९४ आयसीएआर स्थापणा दिवस साजरा करण्यात आला

              डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र,सेलसुरा येथे १६ जुलै, २०२२ रोजी ९४ वा भारतीय कृषि अनुसंधान परिषद दिन, वरीष्ठ शास्त्रज्ञ  व प्रमुख मा.  डॉ. जीवन कतोरे, यांच्या अध्यक्षते खाली साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त मा. केंद्रीय कृषि मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर व मा. श्री. कैलास चौधरी केंद्रीय कृषि मंत्री व किसान कल्याण राज्य मंत्री यांचा शेतकाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
             भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही कृषी आधारीत संशोधन संस्था दि. १६ जुलै, १९२९ साली स्थापन झाली असूनआय.सी.ए.आर.चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालय, भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षणविभाग (DARE) अंतर्गत स्वायत्त संस्था आहे. ही संस्था  संपूर्ण देशात फलोत्पादन, मत्स्यपालन आणि प्राणीविज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शनआणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने आपल्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे भारतातील हरितक्रांती आणि त्यानंतरच्या कृषी क्षेत्रात घडामोडी घडवून आणण्यात अग्रणी भूमिका बजावलीआहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि राष्ट्रीय कृषी संशोधन आणिशिक्षण प्रणाली मोठ्या प्रमाणावर, समाजाच्या कल्याणासाठी विज्ञानाच्या प्रगतीचा उपयोग करण्यासाठी कटिबद्ध आहेत. शाश्वत शेतीसाठी संशोधन आणितंत्रज्ञान विकास योजना, उपक्रम, समन्वय आणि प्रोत्साहन देणे. दर्जेदार मानव संसाधन विकास सक्षम करण्यासाठी कृषी शिक्षणाला मदत देणे आणि समन्वयसाधणे. कृषी-आधारित ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर, अवलंब, ज्ञानव्यवस्थापन आणि क्षमता विकासासाठी फ्रंटलाइन विस्तार करणे. कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तारामध्ये धोरण, सहकार्य आणि सल्लामसलत करणे असे विविध उद्दिष्ट या संस्थेचे आहेत.
             आपल्या देशाची ओळख ‘जगाला अन्नधान्यांचा पुरवठा करणारा देश अशी ओळख आज बनली आहे.  ही  केवळ लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली किंवा शेती क्षेत्रावरीलआर्थिक गुंतवणूक वाढवली, म्हणून झाली नाही, तर बदलत्या काळानुसार येथील कृषी संशोधनाला मिळालेले प्रोत्साहन आणि शेतकर्‍यांच्या अनुभवआधारित ज्ञानाचा प्रसार करणार्‍या संशोधन संस्थांचा विस्तार हे यामागील एकमहत्त्वाचे कारण राहिले आहे.
             भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधन केंद्रांचे मोठे जाळे उभारले आहे.आय.सी.एस.आर. इन्स्टिट्यूट, प्रोजेक्ट डायरेक्टरेट, नॅशनल रीसर्च सेंटर्सआणि नॅशनल ब्यूरो अशा विविध नावांनी मुख्य पिकांसाठीची संशोधन केंद्रे, जरुरीनुसार अधिकार देऊन स्थापन करण्यात आलेले आहेत. यापैकीच कृषि विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी एक छोटे विद्यापीठ आहे जिथे शेती व निगडित सर्वमाहिती प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे प्राप्त होऊ शकते. अशी माहिती डॉ.जीवन कतोरे यांनी दिली. तांत्रिक सत्रा दरम्यान डॉ. रुपेश झाडोदे, शास्त्रज्ञ (कृषिविद्या) यांनी खरीप पीक लागवड तंत्रज्ञान, डॉ. निलेश वझीरे, शास्त्रज्ञ (पीक संरक्षण) यांनी खरीप पिकातील कीड व रोग नियंत्रण, या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमा दरम्यान मोठ्या संख्येने  ग्रामीणयुवक, शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अंकिता अंगाईतकर,  शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी केले. सदर कार्यक्रमा करीता डॉ. प्रेरणा धुमाळ, डॉ. सविता पवार, कांचन तायडे, गजाननम्हसाळ, पायल उजाडे व कृविके येथील सर्व अधिकारी- कर्मचारी वृंद यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *