जागतिक मधुमक्षिका दिन साजरा

                                 कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा जि. वर्धा द्वारे करंजी काजी  जि. वर्धा येथे दि. २०/०५/२०२२ रोजी जागतिक मधुमक्षिका पालन दिनाचे आयोजन करण्यात आले. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परिस स्पर्शा पेक्षा कमी नसतो, तर फलधारनेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही मधमाशा यात महत्वाची भूमिका बजावतात म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशीचे मोठे उपकार आहेत. या बाबतची सर्वत्र जन जागृती करण्याच्या दृष्टीकोणातून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी सरपंच अरुण बालपांडे ,  उपसरपंच श्री. संजय सडमाके हे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्यक्रम समन्वयक डॉ. जीवन कतोरे यांनी भूषविले, तसेच तांत्रिक मार्गदर्शन पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ. नीलेश वझीरे व आयुष हर्बल हनीचे श्री . सैफ खान, श्री. रत्नपारखी, श्री. धिरज बुरगुडे हे उपस्थित होते.

                            मधुमक्षिका पालन हा व्यवसाय शेतीला पूरक असून ज्यादा उत्पन्न वाढीसाठी याचे अनन्यसाधारण महत्व आहे . यापासून मध व मेणाचे उत्पन्न घेता येते . मधुमक्षिका पालन व्यवसाय संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक श्री. खान यांनी संगितले. शेतकरी वर्गाने आता निवळ पिकांवर अवलंबून न राहता सोबत कृषि पूरक उद्योग करावा या करिता कृषि विज्ञान केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन डॉ. जीवन कतोरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, वर्धा  यांनी केले . संचालन व आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण विषयतज्ञ, डॉ. अंगाईतकर यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *