कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ५०वी शास्त्रीय सल्लागार समिती सभा संपन्न

                           डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत येणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी २६ जुलै, २०२१ रोजी ५० व्य शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे आयोजन करण्यात आले. सादर सभेला कृषि व संलग्नन विविध विभागातील अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, ग्रामीण युवा वर्ग उपस्थित होते. या सभेकरिता डॉ. पंदेकृवि, अकोला येथील संचालक, विस्तार शिक्षण डॉ. विलास खर्च यांनी अध्यक्ष स्थान भूषविले, तसेच उपविभागीय कृषि अधिकारी श्री. अजय राऊत व ऑनलाईन पद्धतीने अंतरी पुणे, येथील संचालक, डॉ. लखन सिंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी कृषि पत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर डॉ. उंबरकर, यांनी कृषि विज्ञान केंद्राचा, सन २०२०-२१ चा प्रगती अहवाल तसेच सर्व विषयतज्ञांनी त्यांच्या विषयाचा अहवाल सादर केला.
                          कृषि विज्ञान केंद्र संपर्कातील प्रगतिशील शेतकरी मशरूम उत्पादन महिला शेतकरी सौ. स्नेहलता सावरकर, सेंद्रिय उत्पादक सौ. शोभाताई गायधने, दूधउत्पादक सौ. रुपाली पाटील, श्री. दिलीप पोहणे, श्री. अरुण पेटकर यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                           कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा , कृषी विभाग व कृषी संलग्न विभागातील अधिकारी, शेतकरी यांच्या मध्ये जिल्ह्यातील मुख्य पिके, दुग्ध उत्पादन व पूरक व्यवसाय या बाबत चर्चा करण्यात आली.कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, यांनी एकत्रित काम करून शेतकर्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहचविण्याचे कार्य नियमित सुरु असून शेतकऱ्यांनी शेती व पूरक व्यवसाय संबंधी माहिती साठी कृषी विज्ञान केंद्राची वेळोवेळी मदत घ्यावी व विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. विलास खर्च यांनी केले.
                            शेतकरी व शास्त्रज्ञ यांचा सातत्याने संपर्क राहिल्यास नवीन तंत्रज्ञान सर्वत्र पसरविण्यास वेळ लागणार नाही व शेतकऱ्यांची प्रगती थांबणार नाही असे डॉ. लखन सिंग यांनी मार्गदर्शन केले.
                                         कार्यक्रमाच्या यशस्वीकारिता कृषी विज्ञान केंद्रातील चमूंनी योगदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *