जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य व स्ट्रॉबेरी महोत्सव उत्साहात साजरा

           कृषी विज्ञान केंद्र, सेलसूरा, जि. वर्धा व कृषि विभाग, वर्धा जि. वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १०. २. २०२४ रोजी अन्न आणि पोषण सुरक्षा (पौष्टिक तृणधान्य) सन 2023-24 अंतर्गत जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य व स्ट्रॉबेरी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सदर महोत्सवाचे आयोजन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे मा.कुलगुरू, डॉ.शरद गडाख यांचे कल्पनेतून करण्यात आले. सदर सोहळ्याचे उद्घाटन  माननीय श्री रामदासजी आंबटकर, विधान परिषद सदस्य, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. रणजीतजी  कांबळे, आमदार, देवळी विधानसभा क्षेत्र, हे लाभले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय डॉ.धनराज उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी भूषविले तसेच विशेष अतिथी म्हणून मा.डॉ.देवानंद पंचभाई, अधिष्ठाता, उद्यानविद्या, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.पी.जंगवाड हे उपस्थित होते. तसेच श्री प्रभाकर शिवणकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा, डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जि. वर्धा यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अन्न आणि पोषण सुरक्षा (पौष्टिक तृणधान्य) सन २३-२४ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य व स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा तसेच दत्तक गाव दिघी बोपापूर चे सरपंच श्री संदीप दिघीकर व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री दिलीप पोहाणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माननीय श्री रामदासजी आंबटकर, यांनी अन्न आणि पोषण सुरक्षा (पौष्टिक तृणधान्य) अंतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांचे अभिनंदन केले व शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवलंबन्याकरिता कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मोहरी पिक पाहण्यासारखे असून सर्व शेतकऱ्यांनी ते आवर्जून बघावे असे सांगितले.

माननीय आमदार  श्री रणजीतजी कांबळे यांनी यांनी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी जे आपल्या शेतात नवनवीन प्रयोग घेत आहेत जसे स्ट्रॉबेरी शेती, रेशीम शेती यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होत आहे. स्ट्रॉबेरी पासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे तसेच कृषी विभागाच्या विविध योजना मार्फत शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजने अंतर्गत मदत करण्यात येईल. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले. वर्धा जिल्ह्यात हरभरा, जवस व करडई या सारख्या पिकांकडे मार्केटचा  विचार करून वळावे.

डॉ.धनराज उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न घ्यावे तसेच मुख्य पिकाबरोबर मोहरी व जवस या सारखे पिके घ्यावे असे आवाहन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र, अंतर्गत आदर्श गाव निर्मिती करिता दत्तक घेण्यात आलेल्या दिघी बोपापूर गावातील शेतकऱ्यांनी कृषी शास्त्रज्ञ यांच्या कडून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे मार्गदर्शन केले.

श्री प्रभाकर शिवणकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा यांनी कृषी विभागाच्या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच जिल्हा कृषी महोत्सव निमित्त पौष्टिक तृणधान्य पीक जनजागृती कार्यक्रमाचे सविस्तर मार्गदर्शन केले.

मा.श्री रमेश देशमुख, उपप्रकल्प संचालक, आत्मा यांनी शेती व शेती उद्योगातून अधिक उत्पन्न निर्मितीचा स्त्रोत कसा निर्माण करावा या विषयी मार्गदर्शन केले.

मा.डॉ.देवानंद पंचभाई, अधिष्ठाता, उद्यानविद्या, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी संत्रा पिक लागवड व नियोजन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. जीवन कतोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा वर्धा यांनी कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांपर्यंत विकसित तंत्रज्ञान कश्या पद्धतीने पोहचवितात याबाबत माहिती विषद केली. याप्रसंगी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुरू असलेले महत्त्वकांक्षी प्रकल्प यांची सुद्धा सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तांत्रिक सत्रामध्ये आहारातील तृणधान्याचे महत्व याविषयी गृहविज्ञान, विषयतज्ञ, डॉ.प्रेरणा धुमाळ तर पिकावरील कीड व रोग नियंत्रण या विषयी डॉ.निलेश वझिरे विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *