डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसूरा मार्फत सघन कपाशी लागवड प्रणाली अंतर्गत प्रक्षेत्र दिवस आयोजित करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद -केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारे संचालित कपाशिसाठी सघन लागवड प्रणाली अंतर्गत सन २०२५-२६ दरम्यान हिंगणघाट तालुक्यातील शेगाव कुंड येथे शेतकरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री. दिनकर गुडधे यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटिचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला, या प्रसंगी राशी सीड्स चे श्री. प्रणव धस्कट, श्री किशोर वंजारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सघन लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडाची संख्या वाढवून १०-२०% उत्पन्न पारंपारिक पद्धतीपेक्षा जास्त येणार तसेच पिकांची कॅनॉपी बद्दल माहिती देत कापसाचे बोंड मोठे असल्यास धाग्याची गुणवत्ता उत्तम राहते व सघन लागवड पद्धतीमध्ये पारंपारिक लागवडीच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळते असे मार्गदर्शन डॉ. रुपेश झाडोडे यांनी केले. झाडाच्या उंचीनुसार पिवळे चिकट सापळे लावावे तसेच कपाशीतील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन तसेच कामगंध सापळे वापरल्याने कीड नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे करता येते या विषयी डॉ. निलेश वझिरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री. प्रणव धस्कट यांनी कपाशी पिक लागवड करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी माहिती दिली तर श्री. किशोर वंजारी यांनी गावातील जमिनीनुसार कोणते पिक घ्यावे या विषयी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. सदर कार्यक्रमास शेगाव कुंड, तुळजापूर, किन्हाळा, पाठर या गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी डॉ. पंदेकृवि, अकोला येथे आयोजित अग्रोटेक २०२५ बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
प्रगतीशील शेतकरी श्री. दिवाकर गुडधे यांनी सघन लागवड पद्धती बद्दल अनुभव सांगत एकरी झाडांची संख्या वाढवल्यास व योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्नास हमखास वाढ होईल अशी खात्री शेतकऱ्यांना दिली. याप्रसंगी शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान कपाशी पिकांचे निरीक्षण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विशेषज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री. हरिदास बोरकर, श्री किशोर उगलमुगले ,श्री गणेश वायरे, कु. ऋतुजा कोरडे, श्री वसीम खान यांचे मोलाचे सहकार्य



