कपाशीवरील गुलाबी बॊड अळीचे बिगर हंगामात करावयाच्या उपाययोजना…..

कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा, वर्धाच्या शास्त्रज्ञानी वर्धा जिल्ह्यात सर्व्हेक्षण केले असता निर्देशनास आले कि, जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात कपाशीचे पीक (पऱ्हाटी) शेतामध्ये उभे आहे. याचा परिणाम पुढील खरीप हंगामामध्ये घेण्यात  येण्या ऱ्या कपाशीपिकावर गुलाबी बॊडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पऱ्हाटी लवकरात लवकर शेतामधून काढण्यासाठी शेतकऱ्यांना जागृत असावे.

खालीलप्रमाणे कपाशीवरील गुलाबी बॊडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बिगर हंगामात करावयाच्या उपाययोजना

१. कापूस साठवणूक व संकलन केंद्रे, जिनिंग मिल इत्यादी ठिकाणी कापूस येण्यास सुरवात झाल्यापासून साफसफाई मोहीम राबवून, कापूस जिनिंग नंतर चाळणी वरच्या अळ्या, कोष, कवडी व खराब कापूस इ. वेळोवेळी विल्हेवाट लावावी व त्या परिसरात बिगर हंगामात पूर्णवेळ प्रत्येकी १५ ते २० कामगंध सापळे लावून सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नियमित नष्ट करावे.

२. पिकाचा हंगाम लवकर संपवावा (१६० ते १८० दिवसात) हंगाम बाहेर पीक (फरदड) घेऊ नये. त्यामळे किडींना  अखंड अन्नपुवठा  उपलब्ध होत राहून त्या पुढील हंगामातील पिकांवर त्यांच्या एकमेकांवर पिढ्या तयार होऊन संख्या वाढते पर्यायी कपाशीवर पात्या  अवस्थेपासूनच मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.

३. कपाशीची शेवटची वेचणी संपल्याबरोबर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात म्हणजे त्या कपाशीच्या झाडावर असलेले बॊड, पाने इत्यादी खाऊन टाकतील आणि त्यामुळे यावर किडींच्या अवस्था असल्यास त्या नष्ट होतील.   

४. कीडग्रस्त बॊडेसहित पऱ्हाट्याचे  यंत्राद्वारे कुट करून सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी. पऱ्हाट्याचे ढीग शेतात तसेच ठेवल्यास किडक बॊडातील अळ्यांचे कोषात रूपांतर होऊन कोष तसेच पासून राहून पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढतो . 

५. हंगाम संपल्याबरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील.

६. पूर्व मान्सून कपाशीची लागवड टाळावी म्हणजे पहिल्या पावसाबरोबर जमिनीतील कोषातून निघणाऱ्या पतंगांना खाद्य (पात्या व फुले) उपलब्ध न झाल्यामुळे ते अंडी न टाकताच मारून जातील व गुलाबी बॊडअळीची पहिली पिढी तशीच नष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *