कृषी विज्ञान केंद्र, वर्धा येथे दि. १३/१०/२०२१ रोजी “कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेस मा. डॉ. सी. डी. माई, सचिव, अग्रोव्हीजन फाउंडेशन, नागपूर तथा कार्यकारी सदस्य, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, डॉ. विद्या मानकर, प्रकल्प संचालक, आत्मा, वर्धा, डॉ. विलास अटकरे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, वर्धा , श्री.बोराथकर , ऍग्रोव्हिजन फॉउंडेशन, श्री. हेगडे, पी आय , फॉउंडेशन , डॉ. एम रामासामी, रासी सीड कंपनी, श्री. कमलेश ठलाल, अग्रोव्हीजन फाउंडेशन, नागपूर मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी मा. डॉ. सी. डी. माई, सचिव, अग्रोव्हीजन फाउंडेशन, नागपूर तथा कार्यकारी सदस्य, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन करिता विकसित तंत्रज्ञान PB Rope – L Technology या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच या तंत्रज्ञानाचे अवलंबन करण्याकरिता शेतकरी बांधवांनी गाव पातळीवर समूह गटाच्या माध्यमातून एकत्र यावे असे आवाहन केले.
हवामान बदलानुसार पिकांवर येणाऱ्या कीड व रोग व्यवस्थापनाकरिता जिल्यातील शेतकरी बांधवांनी वेळोवेळी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी व्यवस्थान व बोंडसड व्यवस्थापनासाठी विद्यापीठाचे विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्येंत पोहचण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञानी कार्य करावे असे आवाहन मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, यांनी केले.
कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ.रुपेश झाडोडे,शास्त्रज्ञ,कृषी विज्ञान केंद्र, वर्धा यांनी कपाशी पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन, डॉ. प्रशांत उंबरकर , शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, वर्धा यांनी गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थान या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
