५१ शास्त्रीय सल्लागार समिति सभा संपन्न

                   डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत येणार्‍या वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे ०८जुलै, २०२१ रोजी ५१ व्या शास्त्रीय सल्लागार समिति सभेचे आयोजन करण्यात आले. सादर सभेला कृषि व संलग्न विविध विभागातील अधिकारी , प्रगतिशील शेतकरी, ग्रामीण युवा वर्ग उपस्थित होते. या सभे करिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील संचालक, विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले, डॉ. पी. व्ही. यादगीरवर, सहयोगी संशोधन संचालक, वि.कृ.सं.के., यवतमाल तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री अनिल इंगळे, डॉ. विद्या मानकर, प्रकल्प संचालक आत्मा, वर्धा हे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.

                 डॉ. रूपेश झाडोडे, कार्यक्रम समन्वयक, यांनी कृषि विज्ञान केंद्राचा सन २०२०-२१ चा प्रगति अहवाल तसेच सर्व विषयतज्ञांनी त्यांच्या विषयाचा अहवाल सादर केला . कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व कृषि संलग्न विभागातील अधिकारी, प्रगतिशील शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या मध्ये वर्धा जिल्ह्यातील मुख्य पिके, दुग्ध उत्पादन व पूरक व्यवसाय या बद्दल चर्चा करण्यात आली. दरम्यान कृषि विज्ञान केंद्र संपर्कातील मशरूम उत्पादन महिला उद्योजक सौ. स्नेहलता सावरकर व सेंद्रिय शेती उत्पादक सौ.  शोभाताई गायधणे यांनी त्यांचा अनुभव कथन केला तसेच शास्त्रीय  सल्लागार समितीचे सदस्य व प्रगतिशील शेतकरी श्री प्रसन्नजीत झोड, श्री. अरुण पेटकर, श्री चेतन सोनटक्के, श्री मनोज सावरकर, श्री राजेश नेजकर यांनी सभेमध्ये त्यांचे विचार मांडले व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

               कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग यांनी एकत्रित काम करून शेतकर्‍यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहचविण्याचे कार्य नियमित सुरू असून शेतकर्‍यांनी पिक, कृषि मूल्यवर्धन व कृषिपूरक व्यवसायसंबंधी माहिती मिळविण्याकरिता कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाची मदत घ्यावी व कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ घ्यावा असे डॉ. राजेंद्र गाडे सर यांनी संगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *