शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षण केल्याने जमिनीतील कमतरता व पिकांची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक याबद्दची माहिती प्राप्त हाऊ शकते त्याकरीत कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्या असे आवाहन पी.एम. किसान सम्मान संमेलन कार्यक्रम दरम्यान मा. खासदार, श्री. रामदासजी तडस यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जिल्हा वर्धा येथे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी पी. एम. किसान सम्मान संमेलन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील १२ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान सम्मान निधी ची १२ वी किस्त म्हणजेच १६ हजार करोड रुपये वितरित केले. या दरम्यान प्रधानमंत्री किसन समृद्धी केंद्रांचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पुसा मेळा ग्राउंड येथून करण्यात आले. भारताला सशक्त कृषिप्रधान देश बनविण्यासाठी शेती व शेतकरी समृद्ध असणे आवश्यक आहे. भारत एक कृषि प्रधान देश आहे. भारतातील ७५ टक्के लोक शेती करतात किंवा शेतीवर अवलंबून आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरूवात केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना आत्म निर्भर बनवणे तसेच त्यांना सशक्त करणे हे या योजनेचे मुख्य उदिष्ट आहे. असे मा. पंतप्रधान संबोधन करताना सांगितले.
शेती करताना नवीन तंत्रज्ञान शिकणे आवश्यक आहे. शेतीसोबत उद्योगाची साथ असेल तर वातावरणातील अनियमिततेचा विपरीत परिणाम आर्थिक परिस्थितीवर होणार नाही. जमिनीतील आवश्यक सूक्ष्म घटकांचा आराखडा आपल्या जवळ असणे गरजेचे झाले आहे. ज्यामुळे पिकांना अत्यावश्यक पोषणाची कमतरता भासणार नाही. कृषि विज्ञान केंद्र हे आपल्या जिल्ह्यातील एक कृषी विद्यापीठ आहे, शेतकऱ्यांनी कृविके शास्त्रज्ञांची मदत घेतल्यास निश्चित फायदा होऊ शकतो तर असे मा. खासदार यांनी प्रतिपादन केले.
कृषी क्षेत्रातील विकास देशाच्या उद्योग व सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी मदत रूप ठरतो. भारतातील जास्तीत जास्त लोक कृषी व्यवसाय करतात. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतातील 70 टक्क्याहून अधिक लोक कृषी व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून होते. शेती क्षेत्र अधिक सुदृढ होण्याच्या दृष्टीने पी. एम. किसान सम्मान निधी वितरित केला जात आहे. अशी माहिती डॉ. जीवन कतोरे यांनी दिली.
देशातील कृषी क्षेत्र एक महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपले आहे. येत्या काळात ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आणि रोजगार निर्मिती मध्ये कृषी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावण्यास सज्ज झाले आहे. कृषी प्रक्रिया उद्योग स्वयंरोजगारातूनही उभारता येतात. अशी माहिती कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड यांनी दिली.
कार्यक्रमा दरम्यान मोठ्या संख्येने ग्रामीण युवक, शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी तर आभार डॉ. सविता पवार यांनी मानले. सदर कार्यक्रमा करीता डॉ. प्रेरणा धुमाळ, डॉ. रुपेश झाडोदे, डॉ. निलेश वझीरे, डॉ. सचिन मुळे, गजानन म्हसाळ, पायल उजाडे, किशोर सोळंके, दिनेश चराटे, माधुरी डफडे व इतर कृविके येथील सर्व अधिकारी- कर्मचारी वृंद यांनी योगदान दिले.