किटकनाशक फवारणी तंत्रज्ञान : ठळक बाबी

किटकनाशक फवारणी तंत्रज्ञान : ठळक बाबी 

  • कीटकनाशके खरेदी करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला तसेच त्यांच्या शिफारशींची खात्री करावी.
  • कालबाह्य व मुदत संपलेली कीडनाशके खरेदी करू नये
  • शक्यतोवर हिरवा त्रिकोणाचे चिन्ह असलेली किडनाशके प्राधान्याने खरेदी करावी.
  • कीडनाशकांची लिक (फुटलेली) असलेली पॅकिंग खरेदी करू नये तसेच त्यांचे खाद्यपदार्थासोबत वाहन करू नये.
  • नेहमी संरक्षक कपडे घालूनच कीडनाशकाची फवारणी करावी.
  • फवारणीचे द्रावण तयार करतांना संरक्षित कपडे/साधने घानूनच द्रावण तयार करावे.
  • प्रथम कीडनाशकाची आवश्यक असलेली प्रति एकरी मात्रा प्लास्टिक बकेटमध्ये पुरेशे पाणी घेऊन चांगले काठीने ढवळावे व नंतर पंपामध्ये भरावे.
  • पंपाची निवड पिकाचा घेर, अवस्था व उंची करावी. उंच व दाटलेल्या पिकात सर्व साधारण पायदळ पंपाचा,कमी घेर असलेल्या पिकात (सुरवातीच्या अवस्थेत) पाठीवरच्या पंपाचा तर घेर असलेल्या पिकात पेट्रोल पंपाचा वापर करावा.
  • पंपाला कीडनाशकासाठी हॉलो कोण नोझल तर तण नाशकांसाठी फ्लॅट फॅन नोझल वापरावे.
  • सर्वसाधारण हाय व्हॉल्युम (जास्त दाबाचा) पंपासाठी (पाण्याची जास्त मात्रा लागते) प्रति हेक्टरी ४०० ते ५०० ली. व लो व्हॉल्युम पंपासाठी (कमी दाबाचा) पाण्याची कमी मात्र लागते. २०० ते २२५ लिटर लागते, ती पिकांच्या घेरावर अवलंबुन असते.
  • हाय व्हॉलूम (जास्त दाबाचा )पंपाच्या नोझल मधून १५० ते २५० तर लो व्हॉल्युम पंपासाठी (कमी दाबाचा) पंपामधून ५० ते १०० मायक्रोन या आकाराचे थेम्ब बाहेर पडतात त्यामुळे पंपाचे नोझल नेहमी घट्ट करावे.
  • फवारणी करतांना विशिष्ट दाबावर चालण्याचा वेग नियंत्रित करून झाडावर फवारणी सर्व बाजूने होऊन गडावरील द्रावणाचे थेंबामध्ये रूपांतर होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा थेम्बारूपाने कीडनाशक झाडावरून खाली पडेल व झाडावर फक्त पाणी राहील.
  • फवारणी कंबरेच्या खाली होईल याची खात्री करावी अन्यथा पिकांची उंची जास्त असलयास, त्यासाठी पायडलचा वापर करावा.
  • फवारणीचे द्रावण पंपामध्ये भरताना चाळणीचा वापर करून द्रावण पंपावर सांडणार नाही याची खात्री करावी तसेच लीक असलेले/फुटलेले पंप वापरू नयेत .
  • फवारणी करतांना तंबाखू/बिडी/ खाद्य पदार्थ यांचा वापर करू नये तसेच पंपाचे नोझल तोंडाने फुंकू नये.
  • कीडनाशकांच्या दद्रावणाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास त्वरीत पाण्याने धुवून स्वच्छ करावा.
  • तब्येत बरोबर नसल्यास फवारणी करू नये.
  • तसेच कीडनाशकाची विषबाधा झाल्यासारखे जाणवल्यास जसे चक्कर, मळमळ,अंधुक दिसणे त्वचेची जळजळ, अशक्तपणा, डोकेदुखी इत्यादी लक्षणे दिसल्यास त्वरित फवारणीचे काम थांबवून साबणाने आंघोळ करून स्वच्छ टॉवेलने पुसावे.
  • रोग्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा श्वासोश्वास बंद झाल्यास त्वरित रोग्याला खाली तोंडाने झोपवून कृत्रिम श्वास द्यावा.
  • फवारणी केलेले कीडनाशकांचे माहितीपत्रक/ डबे सोबत घेऊन डॉक्टर कडे न्यावे व त्वरीत उपचार सुरु करावे.
  • फवारणीचे काम झाल्यावर कीडनाशकांचे डबे चपटे करून जमिनीमध्ये गाडावे ते डबे धुवून वापरू नये. तसेच त्यांचा संपर्क पाण्यासोबत येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फवारणीचे सर्व साहित्य धुवून परत तसेच कीडनाशके सुरक्षित कुलूप बंद ठिकाणी ठेवावी.
  • रोगी बरा झाल्यावर त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी वेळोवेळी करून घ्यावी.

संपर्कासाठी पत्ता : कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा, वर्धा