कृषी क्षेत्रात मोबाईल अँपचा वापर

मोबाईल संदेश तंत्रज्ञानाचा जगात सर्वत्र वापर हा संभाषण, माहिती, मनोरंजन इत्यादी बाबतीत तसेच विविध प्रकारच्या सेवा देण्या घेण्याकरिता होतांना सर्वच प्रगत देशात दिसून येत आहे. तसेच या मध्ये शेती व्यवसायात सुद्धा विविध प्रकारची माहिती व मोबाईल तंत्रज्ञानामुळे त्वरित आपणास उपलब्ध होत आहे जसे कि बाजारभाव, नवनवीन पिकांच्या जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान इत्यादी माहिती मिळणे पूर्वी अवघड होते परंतु आजच्या मोबाईल संदेश तंत्रज्ञानाचा वापर लक्षात घेता सदर माहिती एका बटनावर आपण पाहू शकतो. या मुळेच मोबाईल तंत्रज्ञानाचा झपाट्याने वापर वाढत आहे. तसेच  या वापरामुळे मोबाईलच्या किंमती सुद्धा कमी होत आहेत तरी या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या शेती व्यवसायात फारच कमी दिसून येतो. जवळपास सर्वच गावांमध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचे जाळे पसरविण्यात आले आहे  जवळजवळ सर्वच मोबाईलधारक विविध अँपचा वापर विविध प्रकारची माहिती जाणून घेण्यास करतात .  अँप म्हणजे एक संगणक आज्ञावली असून एखादी अचूक माहिती वापरकेल्यास या अँप मार्फत आपणास घेता येते. 

               जवळपास हजारोंच्या संख्येने विविध विषयावर आधारित अँप तयार होऊन गुगल प्ले स्टोअरवर अँप उपलब्ध आहेत. जगात भारत हा मोबाईल अँप डाउनलोड करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा देश असून वापर जगाच्या तुलनेत फक्त १३ टक्केच आहे. (flurry  Analytics and  Nielsen२०१२) एवढी मोठी क्रांती या क्षेत्रात असतानां याचा शेती व्यवसायात फारच कमी प्रमाणांत वापर होतांना  दिसून येते . तरी आज भारत संचार निगम यांच्याद्वारे कृषि  संचार योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. तसेच विविध कंपन्यांच्या योजनांच्या माध्यमातून मोबाईल डेटा फारच कमी दरात उपलब्ध होत आहे तरी या संधीचा फायदा शेतकरी बंधुंनी आपल्या शेती व्यवसायात करावा.  सदर अँप डाउनलोड करण्याकरीता  मोबाईल मधील प्लेस्टोर मध्ये जावून अँपचे नाव टाईप  करावे व डाउनलोड करावे. 

शेतकरी बांधवांसाठी काही महत्वाचे मोबाईल अँप

१. किसान सुविधा ‘kisan suvidha’ (भारत सरकार – कृषी मंत्रालय):

भारत सरकार (कृषी मंत्रालय) द्वारे निर्मित किसान सुविधा या अँपद्वारे आपणास हवामान विषयक माहिती तसेच आपल्या भागातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची  नावे, पत्ते, फोननंबर, विविध पिकाचे बाजारभाव, कीड व रोग  नियंत्रण, माती परीक्षण अहवाल, शीतगृह, साठवण गोदाम , किसान कॉल सेंटरची माहिती व तसेच पशुसंवर्धन  इत्यादी बद्दलची माहिती उपलब्ध आहे.   

२. फार्मर पोर्टल इंडिया “Farmers  Portal  India ” (भारत सरकार – कृषी मंत्रालय) :

भारत सरकार (कृषी मंत्रालय) द्वारे निर्मित फार्मर पोर्टल या अँपद्वारे सुद्धा शेती विषयक माहित,हवामान, उद्यानविद्या, पशुसंवर्धन विषयक माहिती तसेच आपल्या भागातील कृषी निविष्ठा, विविध पिकांचे बाजारभाव, किड व रोग नियंत्रण, माती परीक्षण सुपीकता नकाशा, निर्यात व आयात पशु गणना इत्यादी माहिती या अँप द्वारे आपणास मिळविता येते.

३. एम किसान एस एम एस पोर्टल (भारत सरकार – कृषी मंत्रालय)

 मोबाईल मेसेजिंग हे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी साधन आहे जे जवळ जवळ ८.९३ कोटी शेतकरी पर्यंत कुटुंबाना पोहचते. एम किसान पोर्टलद्वारे कृषी व संबंधित क्षेत्रातील सर्व माहिती/ सेवा / शास्रीयसल्ले त्यांच्या भाषेत, एस एम एस द्वारे देण्यात येतात. यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेटची गरज नाही. शेतकऱ्यांना या पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करून याचा लाभ मिळतो.   कृषी विज्ञान केंद्र, वर्धा मार्फत शेतकऱ्यांना एम किसान पोर्टलद्वारे संदेश मिळतात.

४. डीईईपीडीकेव्ही – ट्रान्सफर ऑफ टेकनोलॉजि/ विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसार ‘DEE  PDKV – Transfer of Technology ‘ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)  या अँप द्वारे विद्यापीठ निर्मित विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान जसे कपाशी,सोयबीन, तेलबिया, कडधान्य, धान , ऊस, गहू, ज्वारी, कृषी अवजारे,विविध पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, कृषी शिक्षण, कृषी संशोधन, विस्तार शिक्षण कार्यक्रम, विद्यापीठ प्रकाशने, विस्तार शिक्षण उपक्रम इत्यादी माहिती आपणास मिळविता येते. तसेच आपल्या प्रतिक्रिया सुद्धा यावर देता येतात व अधिक माहिती करीत संपर्क करण्याकरिता या अँपवर माहिती उपलब्ध आहे

५. पिडीकेव्हीविड  मॅनेजर/ तण  व्यवस्थापन मार्गदर्शन ‘PDKV Weed  Manager’ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला):

या अँपद्वारे विद्यापीठ निर्मित विविध पिकांमधील तण व्यवस्थापनाचे महत्व, पिकातील प्रमुख तणे, रासायनिक तण व्यवस्थापन, रासायनिक तणनाशके अंश व्यवस्थापन,परोपजीवी तणे, फवारणी तंत्र, उपलब्ध तणनाशके, बहुवार्षिक तणांचे नियंत्रण, गाजर गावात नियंत्रण, सेंद्रिय शेती पद्धतीत व्यवस्थापन, संशोधन शिफारसी, आंतरपीक पद्धतीत तणनाशकांचा वापर याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच आपल्या प्रतिक्रिया सुद्धा यावर देता येतात व अधिक माहिती करीत संपर्क करण्याकरिता या अँपवर माहिती उपलब्ध आहे.

६. इफको किसान “IFFCO Kisan ” :

इफको किसान निर्मित किसान या अँपमुळे हवामान विषयक माहिती, शेती विषयक माहिती, उद्यानविद्या तसेच आपल्या भागातील कृषी विक्रेता व खरेदारी, शेतीविषयक बातम्या, ग्रंथालय, विविध पिकांबाबत सल्ला, बाजारभाव,प्रश्न उत्तर तज्ञानां  विचार इत्यादी माहिती या मोबाइल  अँपद्वारे आपणांस मिळविता येते.

शासकीय खाजगी संस्थांनी विकसित केलेले इतर महत्वाचे  मोबाईल अँप :

 १. डेली मार्केट प्राईज (भारत सरकार) २. किसान योजना(महाराष्ट्र)३. रेशीम बंधू ४. मशीनरी गाईड ५. पशु पोषण ६.अग्रोवन ७. डिजिटल मंडी ८. एग रेट ९. एन.पी.के. कॅलकुलेटर १०.कोशल विकास योजना ११. अग्रो  कनेक्ट १२. क्रॉप इन्शुरन्स १३. मंडी सेन्ट्रल १४. अग्रीकल्चर  क्युझ१५. अग्रीकल्चर स्टुडंड १६. अग्रीकल्चर ऍक्ट इंडिया १७. किसान सेवा १८.स्प्रे गाईड १९ फसल बीमा योजना २०. फार्म ओ पीडिया २१.आई.सी.ए.आर. मशरूम २२. पोल्ट्री अँप  २३.आर.एम.एल. फार्मर- कृषी मित्र  २४. ॲग्री अँप २५. ॲग्रीलाइव्ह २६.  किसान ट्रेंड २७. पशु सहायक अँप २८. खेती बाडी २९. बनाना एक्स्पर्ट सिस्टिम ३०. किसान नेटवर्क ३१. अग्रो ग्यान ३२.प्रवरा ऊस तंत्र ३३.ॲग्री झोन ३४. वावर ॲग्री स्कीम   

मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर मनोरंजना व्यतिरिक्त जर आपल्या शेती व्यवसायात सुद्धा विविध चांगल्या नवनिर्मित तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून आपल्या शेती व्यवसायात चांगला फायदा करून घेऊ शकतो. तसेच ज्यांना या अँपबद्दल माहिती आहे त्यांनी इतर शेतकऱ्यांना सुद्धा या बद्दल अवगत करावे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *