खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे दिघी(बो) गावात आयोजन

शेतीच्या त्रिसूत्रीकरणातून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवा: मा. कुलगुरू यांचे आवाहन

खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा ठरला दिघी ग्रामस्थांसाठी एक अविस्मरणीय सोहळा

शेतकरी फक्त कुटुंबाचाच नव्हे तर जगाचा पोशिंदा आहे आणि बदलत्या ऋतूनुसार शेती तंत्रज्ञान अंगिकरणे काळाची गरज आहे. पिकांच्या सुधारित जाती, कुक्कुटपालन, शेती औजारांचा वापर याबाबींवर भर देणे व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्याने खर्च कमी करून जास्त उत्पन्न मिळावा असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे मा. कुलगुरू डॉ. शरदचंद्र गडाख यांनी केले. प्रथम विद्यापीठाने दिलेल्या तंत्रज्ञानाचा जसे रुंद सरी वरंबा पद्धती, स्प्रे पंप, स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा उपयोग करावा, द्वितीय उत्पादित मालाचे आकर्षित ग्रेडिंग व पॅकेजिंग करून मूल्यवर्धन करावे व तृतीय गावामध्ये भाडे तत्वावर औजारे बँक तयार करवी जेणेकरून उत्पादन खर्च ५० टक्के कमी होईल. आदर्श गाव निर्माण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी संघटित व्हावे व संलग्नित विभागांच्या सहकार्याने गावाचा विकास करावा असे प्रतिपादन मा. कुलगुरू यांनी केले. 

             डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित  वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत आदर्श गाव निर्माण संकल्पना मा. कुलगुरू यांचा संकल्पनेतून वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील दिघी बोपापुर या गावामध्ये स्थापन करण्यात आली. या अनुषंगाने विद्यापीठ तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले, मा. संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदिरवाडे, मा. उपजिल्हाधिकारी श्री. सोपान कासार, मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. प्रभाकर शिवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच नगर परिषद देवळी येथील डॉ. नरेंद्र मदनकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अजय राऊत, मंडळ कृषी अधिकारी श्री. गुट्टे, नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक  श्री. सुशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुंभार, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड, पाणी फाउंडेशन चे श्री. भूषण कडू, आयजीएसएस च्या राज्य समन्वयक सौ. एकता बरतारिया, माजी सरपंच श्री. घनश्याम कांबळे, पोलीस पाटील सौ. प्रतिभा फुलमाळी यांची प्रमुख उपस्थित होती.

            शेतकऱ्यांनी फक्त पारंपारिक शेती पद्धतीवर अवलंबून न राहता  नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा जसे बीबीएफ यंत्राचा वापर, रेशीम शेती उद्योग, रोपवाटिका उद्योग स्थापन करण्यावर भर द्यावा. पीएमइजीपी, सीएमइजीपी या योजनेमधून ३५ टक्के सबसिडीचा फायदा गावातील तरुण शेतकऱ्यांनी द्यावा. गावातील भाजीपाला तालुका किंवा जिल्हास्तरीय विक्रीसाठी भाजीपाला विक्रीसाठी ३५ टक्के अनुदान मिळते याचा सुधा गावातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. जिल्हाधिकारी यांनी केले. या दरम्यान मा. जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे जिल्हा नियोजन अंतर्गत शेतीपयोगी विविध प्रकल्पांना मंजुरात देऊन शेतीला प्रगतीची दिशा प्राप्त करून दिली याबद्दल मा. कुलगुरू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील विविधी यंत्रणा एकत्रित येऊन गावामध्ये शेती विषयक उपक्रम राबवावे तसेच शास्त्रज्ञाच्या मदतीने शेतकऱ्यांनी शेती निगडित अडचणींवर मात करावी असे मार्गदर्शन डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी केले. खरीपपूर्व हंगाम दरम्यान शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी व त्याकरिता कृषी विभागाची मदत घ्यावी असे प्रतिपादन श्री. प्रभाकर शिवणकर यांनी केले. वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी दिघी गावातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र , सेलसुरा येथील विषयतज्ञ यांचेकडून शेती निगडित बाबींची माहिती घेत रहावी   व कृषिपुरक उद्योग उभारणीवर भर द्यावा अशी माहिती प्रास्तविका दरम्यान दिली.  कृषी आधारित उद्योगाकरिता तसेच पिक कर्जाबद्दल व  बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक श्री. चेतन शिरभाते यांनी केले. शेतकऱ्यांनी बीजोत्पादन उपक्रम या आदर्श गावामध्ये घ्यावा  त्यासाठी महाबीज मदत करेल असे जिल्हा व्यवस्थापक श्री. आर. आर. राठोड यांनी माहिती दिली तसेच जिल्हा रेशीम विभागाच्या वरीष्ठ तांत्रिक अधिकारी श्रीमती रजनी बनसोड यांनी रेशीम शेती करिता उपलब्ध बाजारपेठ तसेच रेशीम उद्योगाच्या विविध योजना याबद्दल माहिती देऊन या गावामाशे ३ ते ४ शेतकऱ्यांनी मनरेगा या योजनेतून उभारावे त्यासाठी रेशीम विभाग मदत करेल असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. निलेश वझीरे यांनी बीज प्रक्रियेचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. या दरम्यान  शेतकऱ्यांच्या शेतावर व्हार्मिबेड व व्हार्मी कल्चर  व ड्रोनद्वारे फवारणी प्रत्यक्षिकाचे  आयोजन तसेच मिनिकीट चा वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

          सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. रुपेश झाडोदे यांनी केले. या दरम्यान डॉ. प्रेरणा धुमाळ, डॉ. सचिन मुळे, श्री. गजानन म्हसाळ, पायल उजाडे, किशोर सोळंके, श्री. रवी मानकर, आशिष दिघीकर, संदीप दिघीकर, प्रशांत होले, हनुमंत पचारे, वैशाली दिघीकर, मनोश्री पाटील, रोशन फाले, संदीप कांबळे, शारदा फुलोरकर तसेच सर्व ग्रामस्थांनी योगदान दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *