कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा जि. वर्धा येथे डेसी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न…

                        डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे दि. 15 फेब्रुवारी, 2022 रोजी डेसी अभ्यासक्रमाचे 40 कृषि निविष्ठा विक्रेत्यांना यशस्वीरीत्या अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

                      सदर अभ्यासक्रम 48 आठवड्यांमध्ये घेण्यात आला व त्यामध्ये शेतीसंबंधित विविध विषयांवर प्रात्यक्षिकसाहित माहीत देण्यात आली. कृषि निविष्ठा विक्रेत्यांना गावातील कृषि संलग्नीत तसेच महत्वाची पिके याबद्दल माहिती आकलन करून शेतकर्‍यांना योग्य निविष्ठा विक्री करावी असे अपेक्षित आहे, याबाबत डॉ. विद्या मानकर प्रकल्प संचालक, आत्मा, वर्धा यांनी मार्गदर्शन केले.

                      शेती संबंधित नवीन तंत्रज्ञानातील अभ्यास करून ते तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकर्‍यांपर्यंत पोहचले जाईल ज्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये तसेच उत्पादांनामध्ये भर पडेल असे  डॉ. जंगवाड, प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, सेलसुरा यांनी मार्गदर्शन केले.

                        डेसी अभ्यासक्रमाच्याप्रशिक्षणार्थीनी शेतकर्‍यांना कृषि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने योग्य मार्ग दाखविणे, तसेच नवनवीन तंत्रज्ञानमध्ये होत असलेल्या बद्लानुसार स्वत:ला परिपूर्ण ठेवणे व करी पद्धती समजून घेऊन शेतकर्‍यांना उन्नतीच्या दृष्टीने मार्ग दाखविणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील कार्यक्र्म समन्वयक डॉ. रूपेश झाडोदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *