जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न

                     कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा, जि. वर्धा मार्फत जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी श्रीमती सुचिता मडावी, नगराध्यक्ष, पंचायत समिती,देवळी, श्री अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री.हाडके जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी, डॉ. विलास साखरकर, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, वर्धा उपस्थित होते.
                 शेतकऱ्यांना याप्रसंगी तांत्रिक मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले असून मृदा परीक्षण ही काळाची गरज आहे. मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धती व माती परीक्षणानुसार खताचा योग्य तो वापर इत्यादी बाबत अवगत करून देण्यात आले. शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याचे आवाहन डॉ. विलास साखरकर, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, वर्धा यांनी केले. ३० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *