कृषी विज्ञान केंद्र, सेलसूरा, जि. वर्धा व कृषि विभाग, वर्धा जि. वर्धा व पोकरा २.० यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यक्रम

कृषी विज्ञान केंद्र, सेलसूरा, जि. वर्धा व कृषि विभाग, वर्धा जि. वर्धा व पोकरा २.० यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यक्रम मंगळवार दिनांक २९/९/२०२६ रोजी खरांगणा ता आर्वी येथे पार पडला. खरांगणा हे गाव आदर्श गाव बनविण्याच्या डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या संकल्पनेतून, डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. जिवन कतोरे, प्रमुख कृविके, सेलसुरा यांच्या नेतृत्वात खरांगणा येथे सोयाबीन व कापूस पिक स्पर्धा, सोयाबीन, कपाशीचे नविन वाण वापरुन सघन कापूस लागवड,सोयाबीन पिकामध्ये रुंद वरंबा व सरी पद्धतीने लागवड, पशुआधारित शेतीपूरक व्यवसाय यांसारखे उपक्रम राबविण्यात येत असून दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी कृविके, सेलसुरा व तालुका कृषि अधिकारी कार्यालय, व पोकरा २.० यांच्या संयुक्त विद्यमाने खरांगणा मार्फत पोषण बाग उपक्रम अंतर्गत बियाणे वाटप तसेच औषधी वनस्पती चे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.प्रेरणा धुमाळ, यांनी दैनंदिन आहारामध्ये पोषण बागेचे महत्व या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. भारती तिजारे, यांनी सद्य स्थितीतील पिक परिस्थिती यामध्ये प्रामुख्याने कपाशी व तूर पिका विषयी तसेच रब्बी हंगामातील पिक व्यवस्थापन उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ.सचिन मुळे यांनी अल-निनो मुळे पशुवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना तसेच पोकरा २.० अंतर्गत पशु व्यवसाय निगडीत मिळणारे लाभ याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.सविता पवार यांनी गावातील महिलांनी पोकरा योजनेचा लाभ घेउन तेलघाणी तसेच दालमिल प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आव्हान केले. सेवा संकल्प अभियान अंतर्गत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख देण्यासाठी सप्टेंबर २०२६ मध्ये ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे याचा प्रमुख उद्देश शेतकरी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फायदेशीर ठरेल.
पोकरा समन्वयक श्री चौधरी यांनी पोकरा योजनेचा महिला शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाविषयी मार्गदर्शन केले. तसेच विजय सहारे (NRM) यांनी मृदा व जल संधारण व विहीर पुनर्भरण याबाबत व पोकरा अंतर्गत विविध योजनेचे मार्गदर्शन केले. श्री नितीन ढगे, सहाय्यक कृषि अधिकारी व मनीष लीडबे, पोकरा समुह सहाय्यक व कृषी सखी नीलिमा अक्कलवार यांनी उपस्थित महिला शेतकरी यांची महिला शेतकरी प्रमाणपत्राची नोंदणी करून घेण्यात आली.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराचे श्री अक्षय धुमाळ , श्री गणेश वायरे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *