डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेले वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराच्या वतीने विविध ग्रामीण भागांमध्ये सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रम कृषि विद्यापीठ, अकोला ने कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख व संचालक (विस्तार शिक्षण) मा. डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या आधिपत्याखाली तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या पार्श्वभूमीवर कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व कृषि विभाग यांच्या समन्वयाने वर्धा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ज चमूने कारंजा तालुक्यातील मोर्शी, मालेगाव, देवळी तालुक्यातील दिघी, बोपापूर, हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर, आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, चीस्तूर, आर्वी तालुक्यातील खरांगणा, मोरांगना, समुद्रपूर तालुक्यातील बावापूर, हरणखुरी, सेलू तालुक्यातील किन्ही-मोही आणि वर्धा तालुक्यातील आमाला या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे दिले. शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा मुख्य उद्देश कृषि संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांचा लाभ थेट शेतकयांच्या दारी पोहोचवणे हा आहे. या अभियानामुळे शेतकन्यांना शेतीतील समस्यांवर तत्काळ व अचूक उपाययोजना मिळण्यास मदत होत आहे.या दरम्यान कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले आधुनिक पीक लागवड तंत्रज्ञान व अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली. पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझिरे यांनी सोयाबीन, तूर व कपाशी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे, यावर प्रकाश टाकला. विशेषतः कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे व योग्य फवारणीवावत मार्गदर्शन केले. कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. सविता पवार यांनी आधुनिक कृषि औजारांचा वापर, पाण्याचे व जमिनीचे संवर्धन करणारी रुंद वरंवा-सरी पद्धत आणि आधुनिक ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाचे शेतीतील महत्त्व विशद केले. पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, मुरघास बनविण्याची पद्धती, अझोला निर्मिती तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. तसेच गृह विज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घराच्या अंगणात पोपण बाग उभारणी आणि रोजच्या आहारात औषधी वनस्पतींचे महत्त्व याविषयी शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले.
कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व सहाय्यक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन थेट बांधावर पीक पाहणी केली. सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर आढळणाऱ्याा कीड-रोगांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून शेतकयांना तात्काळ व प्रभावी उपाययोजना सुचवल्या. सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कृषि विभागाचे श्री. विशाल मंगळे, कु. प्रियंका ताकसांडे, थी. सुनील हिवसे, थी. राजेश चांदेवार, श्री. प्रणव मोरे, वेलस्पन फाउंडेशन चे श्री दीपक लढी तसेच प्रगतीशील शेतकरी सौ. निलीमा अक्कलवार, श्री. दीपक बर्डे, श्री. प्रशांत भोयर, श्री किशोर कुडमेथे यांनी योगदान दिले.



