कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जि. वर्धा आणि कृषि विभाग, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी प्रशिक्षण आष्टी तालुक्यात आयोजित करण्यात आले . डॉ. भारती तिजारे, विषय विशेषज्ञ, कृषिविद्या यांनी रब्बी हंगामातील पिक नियोजन, खत व्यवस्थापण त्याच बरोबर शेतकरी शास्त्रज्ञ सुस्वाद साधण्यात आला. कृषि विभागद्वारे विविध योजनाची माहिती शेतकर्यांना देण्यात आली. पंचायत समिती, आष्टी,लहान आर्वी या गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.






