Celebration of International Women’s Day and Health Checkup Camp

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने ०८ मार्च, २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने, जागतिक महिला दिन व निशुल्क महिला आरोग्य शिबीर कार्यक्रमाचे आयोजन मा. डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी पौष्टिक तृणधण्यापासून बनविण्यात येणार विविध पदार्थ याबद्दल गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ  यांनी माहिती देऊन जागरूकता निर्माण केली. महिला सक्षमीकरणासाठी भारत सरकारच्या अनेक योजना आहेत. यातील अनेक योजना रोजगार, शेती आणि आरोग्य यासारख्या गोष्टींशी संबंधित आहेत. भारतीय महिलांची परिस्थिती लक्षात घेऊन या योजना तयार करण्यात आल्या आहेत जेणेकरून त्यांचा समाजातील सहभाग वाढेल अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक सौ. ओमलता भोयर यांनी दिली. महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद व योग साधना या विषयी महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयात येथील डॉ. पूनम सावरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपप्राथमिक आरोग्य केंद्र, सेलसुरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी गायकवाड व त्यांच्या चमू द्वारे महिलांचे उच्च रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन ची तपासणी व सर्दी- खोकला यावर औषधींचा वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रमादरम्यान कृविके दत्तक गाव दिघी (बो.) येथील सरपंच मा. घनश्याम कांबळे, सेलू तालुक्यातील खापरी (शी.) येथील उपसरपंच श्री. सुरेश गव्हाळे यांनी महिलांना मार्गदर्शनातून प्रेरित केले. महिलांनी घर व शेती काम करीत असताना स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष देण आवश्यक आहे, काळानुसार बदल व संघर्ष करण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावे तसेच शेती मध्ये काम करत असताना मुख्य पिकं व खत व्यवस्थापन याबद्दलची माहिती इफको चे क्षेत्र प्रतिनिधी श्री. राहुल भुजाडे यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी तर  मान्यवरांचे आभार पशु व दुग्ध संवर्धन विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. रुपेश झाडोदे, डॉ. निलेश वझीरे, श्री. गजानन म्हसाळ, पायल उजाडे, वैशाली सावके, समीर शेख,  दिनेश चऱ्हाटे, गजेंद्र मानकर, वसीम खान यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *